Nashik News: ग्रामीण पोलिस दलातील १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या – transfer of 3 officers of rural police force Times

Nashik NEWS


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रशासकीय कारणास्तव ग्रामीण पोलिस दलातील पोलिस प्रभारी
अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात वाहतूक शाखेसह
मालेगाव तालुका, वाडीवऱ्हे, नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांचा
समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शहर पोलिसांनी अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय
कारणास्तव बदल्या केल्या आहेत. ग्रामीण पोलिसांनी सुद्धा कालावधी
पूर्ण झालेल्या तसेच इतर प्रशासकीय कारणाने या १६ अधिकाऱ्यांच्या
बदल्या केल्या आहेत. यात नव्याने हजर झालेल्या सहा सहायक पोलिस
निरीक्षकांचा समावेश आहे.

पोलिस निरीक्षक बदल्या

अधिकारी- कोठून- कोठे

पीआय नरेंद्र भदाणे- वाहतूक शाखा, मालेगाव- मालेगाव तालुका पोलिस
ठाणे

पीआय देविदास भोज- अर्ज शाखा- शहर वाहतूक शाखा, मालेगाव

पीआय सुहास देशमुख-वाडीवऱ्हे ठाणे – प्रशासकीय कालावधी पूर्ण

पीआय विश्वजीत जाधव- मालेगाव तालुका ठाणे- वाडीवऱ्हे ठाणे

पीआय विष्णू आव्हाड- निफाड ठाणे- मानव संसाधन विभाग

पीआय रंगराव सानप- मानव संसाधन विभाग- निफाड ठाणे

पीआय शहाजी नरसुडे- नियंत्रण कक्ष- उपअधीक्षक मुख्यालय

सहायक पोलिस निरीक्षक बदल्या

अधिकारी- कोठून- कोठे

एपीआय स्वप्ना शहापूरकर- वडेनर भैरव ठाणे- अर्ज शाखा

एपीआय गणेश गुरव- चांदवड ठाणे- वडनेर भैरव ठाणे

एपीआय विजय माळी- नाशिक ग्रामीणसाठी हजर- सिन्नर ठाणे

एपीआय कुणाल सपकाळे- नाशिक ग्रामीणसाठी हजर-पिंपळगाव (ब) ठाणे

एपीआय ईश्वर पाटील- नाशिक ग्रामीणसाठी हजर- नांदगाव ठाणे

एपीआय निलेश बोडखे- नाशिक ग्रामीणसाठी हजर- सुरगाणा ठाणे

एपीआय किरण पाटील- नाशिक ग्रामीणसाठी हजर-सटाणा ठाणे

एपीआय हेमंत पाटील- नाशिक ग्रामीणसाठी हजर- मालेगाव तालुका ठाणेSource link