…तर फडणवीसांना विधानसभेची पायरी चढण्याचा अधिकार नाही,राऊत यांचा हल्लाबोल

Nashik NEWS


नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे
चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो
राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील
अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी
करताना पंकजा मुंडे नव्हे तर भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेनेच्या
संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. 

नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद
साधला. गेल्या आठवड्यात बहुमताचा दावा करून मुख्यमंत्री पदाची शपथ
घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या कार्यकाळात
विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारकडे असलेले
चाळीस हजार कोटी रुपये परतं केल्याचे वक्तव्य केले होते त्या
अनुशंगाने खासदार राऊत म्हणाले, हेगडे यांनी केलेले वक्तव्य गंभीर
असून भाजपने जनतेसोबत धोका केलेला आहे. फडणवीस यांनी चाळीस हजार
कोटी रुपये परत केले असतील तर फडणवीस यांच्यासह संपुर्ण भाजप
महाराष्ट्रातील जनतेचे गुन्हेगार आहेत. परंतू त्यांनी हेगडे यांनी
केलेले वक्तव्य नाकारल्याने त्यांच्यावर विश्‍वास ठेवू मात्र
हेगडे यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आढळल्यास राज्याशी बेईमानी
ठरेल. फडणवीस यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नाही.

नक्की वाचा-बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा
भुजबळांकडे,पहा कोण कुठे राहणार

पाच वर्षात कर्जाचा डोंगर उभार करून ठेवला

पाच वर्षात राज्य सरकारने न केलेल्या कामांच्या जाहीराती करून
कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवलाय तो आर्थिक गाडा रुळावर आणावा
लागेल. शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बुलेट ट्रेनला विरोध
यापुर्वी देखील होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
त्याबाबत निर्णय घेतील. अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या
बंडाबाबत आता तो अध्याय संपल्याचे वक्तव्य राऊत यांनी केले. उध्दव
ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झालेले सरकार जनतेच्या
हिताचे निर्णय घेतली. खातेवाटपाबाबत तीनही पक्षांमध्ये सुत्र ठरले
असून मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री लवरकच घेतील.
नाणार प्रकल्पाबाबत गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री
घेणार असल्याचे ते म्हणाले. 

भाजप नेते संपर्कात 
माजी मंत्री पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या
चर्चेवर बोलताना राऊत म्हणाले, पंकजा मुंडेचं काय भाजपचे अनेक
वरिष्ठ नेते शिवसेनेच्या संपर्कात आहे. भाजप मधील असंतोषाबद्दल
बोलणे त्यांनी टाळले परंतू पंकजा मुंडे यांच्या बाबत बारा
डिसेंबरलाचं काय असेल ते कळेल असे सांगून राज्याच्या राजकारणातील
सस्पेन्स कायम ठेवला. 
 Source link